माझा चहा आणि मी…☕
बसलो होतो फक्त दोघेच, एकांतात सगळ्यांच्या डोळ्यांआड सांगायचे होते त्याला काहीतरी खास, फावल्या वेळात माझ्या मनातली , गुपित आज त्याला शेअर करायचे होते, प्रत्येक पेयाबरोबर ,त्याला एक वचन द्यायचे ठरवले होते…

तिकडे मात्र नवलच सार, तो तर खूप दुखावलेला होता तरीही खोट हासु ओढत होता माझ्या डोळ्यानदेखत कारण काय सांगू मी कान पकडला होता त्याचा मी मात्र फार सुखावले होते कारण तो हविशी ऊब देत होता मला
सांगायला नको, त्याच आणि माझं नातं सगळ्यांपेक्षा वेगळे आहे प्रत्येक दिवसाच्या सकाळ सायंकाळी न चुकता दर दिवसा ,आम्ही भेटतो एकमेकांसाठी कुजबुजतो बरंच काही त्याला माहित आहेत माझ्या ओठांवरचे शब्द सारे आणि हावभावही माझे सारे तो लगेच कैद करतो न्हारे
सहवासात एकमेकांच्या दोघेही विरघळतो त्याच्या सानिध्यात, भुक ही विसरायला होते मला माझी कारण तो आहे स्पेशल आणि मी त्याची बिस्किटवडी
दोघांमधला वेळ कसा पुढे सरकतो, लक्षातही येत नाही मला मग चटकन तो निघताच, पुन्हा भेटण्याची वेळ सांगून टाकते त्याला सारख सारख घड्याळाच्या काट्या कडे पाहते, त्या आसुसलेल्या चातकाप्रमाणे उचक्या त्याला न चुकता लागतात हे मात्र खरं
आता एकदाच सांगूनच टाकते म्हणतेय त्याला माझ्या मनातलं हो ऐक जरा, कानाडोळा न करता … प्रत्येक दिवसागणि झोपते,तुला उद्या भेटण्याच्या आशेवर हो!हो! हो! मीच ती वेडी तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी आठवणीत असुदे माझ्यासारख्या प्रत्येकाला हीच आपल्या भेटीमागची खरी पोचपावती माझ्या स्मरणातली…
…✍️ प्रतीक्षा आंबोरे.