तारूण्याच्या या उंबरठ्यावर थोडे ,मागे वळुन पहावयासे वाटतेय त्या गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚
शब्द अडकडावेसे वाटतायेत, धपकन तोंडावर पडुनही, पुन्हा धडपडत चालावेसे वाटतेय त्या गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚
निरागस ते बालपण, पुन्हा अनुभवावेसे वाटतेय नाही कसलीच आशा निराशा फक्त हवीशी ती गोड माया म्हणून की काय, त्या गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚
त्या बालपणीच्या मैत्रीणी ही सगळीकडे विखुरल्यात कुणी तर, सासरी पण गेल्यात म्हणून पुन्हा त्या गोजिरवाण्या बालपणात जावेसे वाटतेय..🧚
कबड्डी,खो-खो,लंगडी, लपंडाव सारे खेळ पुन्हा खेळावेसे वाटतायेत, इवल्या- इवल्याशा पावलांनी, पुन्हा गाण्यांवर थिरकावेसे वाटतेय, त्या गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚
शाळेची घंटा वाजताच, लगबगीने निघावेसे वाटतेय ती आडवी खटक्यांची बॅग अडगळीतुन काढून पुन्हा पाठीवर घ्यावीशी वाटतेय पुन्हा त्या गोजिरवाण्या बालपणात जावेसे वाटतेय..🧚
त्या भातुकलीच्या खेळनींची बास्केट हातात घेऊन, खेळ मांडावासा वाटतोय तु पोळ्या कर,मी भाजी करते म्हणून खमंग फोडण्या द्याव्याशा वाटतायेत भुलाबाई देऊळीत मांडुन,मैत्रीणींना घरी बोलावण्याचे निमित्त मात्र शोधावेसे वाटतेय पुन्हा त्या,गोजिरवाण्या बालपणात जावेसे वाटतेय..
तु दहा झोके दे,मी दहा झोके देईल म्हणून आळी पाळीने खेळावयासे वाटतेय सगळं गाव अक्षरंक्षा हुंदडत,चौफेर फिरावेस वाटतेय देवापुढे हात जोडून देवा ‘ तु ‘असं कर तसं नको, तसं कर असं नको, म्हणून माघारी यावंस वाटतेय पुन्हा त्या, गोजिरवाण्या बालपणात जावेसे वाटतेय..🧚
सा़ॅरी आणि थॅक्यु हे शब्द त्या बालपणात नव्हते, म्हणुनच कदाचीत त्या,गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚
…. ✍️ प्रतीक्षा आंबोरे.
